‘लोकपाल’चे नियम ठरले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:51 AM2019-10-16T04:51:41+5:302019-10-16T04:51:46+5:30

सहा महिने उलटल्यानंतरही अनिश्चितता; प्रशिक्षण विभागासोबत संवाद

The rules of 'LOKPAL' are not fixed | ‘लोकपाल’चे नियम ठरले नाहीत

‘लोकपाल’चे नियम ठरले नाहीत

Next

हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अध्यक्षांसह नऊ सदस्यांच्या नियुक्तीसह लोकपाल संस्था होऊन सहा महिने उलटल्यानंतरही कार्मिक व प्रशिक्षण विभागाने ‘लोकपाल’ संस्थेच्या कामकाजासाठी अद्याप नियम आणि कार्यप्रणाली निश्चित करण्यात आलेली नाही.


लोकपाल संस्थेचे अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) हे गेल्या लोकपाल संस्थेसाठी नियम आणि कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागासोबत संवाद साधत आहेत. लोकपाल संस्थेचे प्रभावीपणे सुरु करता यावे, यासाठी नियम आणि कार्यप्रणाली निश्चित करणे जरुरी असल्याबाबत ते आग्रही आहेत. भ्रष्टाचारासंबंधी मंत्र्यांसह सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारदाराला तक्रार करता येऊ शकेल, यासाठीचे प्रारुप कर्मिक व प्रशिक्षण विभागाला तयार करायचा आहे. उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध साध्या कागदाऐवजी विहित नमुन्यातील प्रारुपात तक्रारादाराने तक्रार दाखल करावी, असे सरकारचे मत आहे; परंतु, यासाठीचे प्रारुप अद्याप तयार करण्यात आलेले नाही. मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन लोकपाल संस्था स्थापन केली. नियम आणि कार्यपद्धती अभावी तक्रारींबाबत लोकपाल संस्थेला कार्यवाही करता येत नाही. सरकारी कर्मचांºयाविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणे हाताळणाºया केंद्रीय दक्षता आयोगाला लोकपालाच्या कक्षेत आणावे की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

लोकपाल कार्यालयाचे कामकाज सध्या चाणक्यपुरीस्थित द अशोक हॉटेलातून चालते. कार्यालयासाठी दुसरी जागा शोधली जात आहे. लोकपालांकडे सहाशेहून अधिक तक्रारी आल्या असून यापैकी बव्हंशी तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत; परंतु, नियम व कार्यपद्धतीअभावी लोकपालांंना कार्यवाही करता येत नाही. विविध तक्रारी प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी संपर्क साधला असता एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नियम आणि कार्यप्रणाली ठरविली जात आहे.

आठ सदस्यांत चार माजी न्यायाधीश
न्या. घोष हे लोकपाल संस्थेचे अध्यक्ष असून अन्य आठ सदस्यांत चार माजी न्यायाधीश आणि चार माजी सरकारी अधिकारी आहेत. यात माजी न्या. दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अभिलाषा कुमारी आणि अजय कुमार त्रिपाठी तसेच माजी आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम, महाराष्टÑाचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, माजी आयआरएस अधिकारी महेंद्र सिंग, आयएएस अधिकारी इंद्रजीतप्रसाद गौतम यांचा समावेश आहे.

Web Title: The rules of 'LOKPAL' are not fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.