नियमबा पेट्रोल पंप, डीलर्सची मध्यस्थी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नियमबा पेट्रोल पंपांसंदर्भातील जनहित याचिकेत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी अर्ज केला आहे. न्यायालयाने बुधवारी हा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत नियमबा पेट्रोल पंपांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत.

नियमबा पेट्रोल पंप, डीलर्सची मध्यस्थी
न गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नियमबाह्य पेट्रोल पंपांसंदर्भातील जनहित याचिकेत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी अर्ज केला आहे. न्यायालयाने बुधवारी हा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत नियमबाह्य पेट्रोल पंपांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत. कामठी येथील प्रदीप सपाटे व राम अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. पेट्रोल पंपाच्या जोडरस्त्याची लांबी, रुंदी, वळण व इतर बाबी तांत्रिकदृष्ट्या अचूक असाव्या लागतात, जेणेकरून पेट्रोल पंपाकडे जाताना व तेथून बाहेर पडताना वाहन थेट मुख्य रस्त्यावर येणार नाही. परंतु, हे नियम कुणीच पाळत नाही. कोणी जोडरस्त्याची परवानगी न घेता तर कोणी मंजूर आराखड्याप्रमाणे जोडरस्त्याचे बांधकाम न करता पेट्रोल पंप सुरू केले आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. डीलर्स असोसिएशनने रस्ते व इतर बाबींच्या नियमांची पूर्तता करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांची असल्याचे स्पष्ट केले आहे. ना हरकत प्रमाणपत्र तेल कंपन्यांच्या नावाने दिले जाते. असे असले तरी डीलर्स असोसिएशनचे सदस्य नियमांची पूर्तता करण्यास तयार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. संघटनेतर्फे ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.