केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या, 8 जण अटकेत
By Admin | Updated: February 16, 2016 15:10 IST2016-02-16T13:26:14+5:302016-02-16T15:10:09+5:30
केरळमधील कन्नूरमध्ये आरएसएस कार्यकर्ता पी व्ही सुजीत याची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली

केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या, 8 जण अटकेत
>
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 16 - केरळमधील कन्नूरमध्ये आरएसएस कार्यकर्ता पी व्ही सुजीत याची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. पी व्ही सुजीतच्या घरच्यांसमोरच त्याची हत्या करण्यात आली. बचावासाठी गेलेले नातेवाईकदेखील या हल्यात जखमी झाले आहेत
या हल्यात कन्नूर जिल्हा पंचायतीचे सदस्य वेणुगोपाळदेखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.
भाजप नेत्यांनी मात्र या हत्येमागे सीपीआय कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. रविवारी भाजपा आणि सीपीआय कार्यकर्ते आपापसांत भिडले होते, ज्यामध्ये अजानूर ग्रामपंचायतीच्या 3 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
कन्नूर जिल्ह्यातच डिसेंबर 2013मध्ये भाजपा नेता विनोद कुमार यांची हत्या करण्यात आली होती ज्यामध्ये 2 नेते जखमीदेखील झाले होते.