शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RSS Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर (प्रजनन दर) घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जातो, तेव्हा तो समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. अशा कितीतरी भाषा आणि समाज नष्ट झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने 3 मुलांना जन्म दिला पाहिजे.' दरम्यान, भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत.

सपा प्रवक्त्याची टीकासमाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, 'मोहन भागवतांची वक्तव्ये भाजपला अस्वस्थ करणारी असतात. गेल्या वेळीही मोहन भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधणे बंद करावे. मंदिर-मशिदीचे राजकारण करणाऱ्यांकडे तेव्हा उत्तर नव्हते. आता मोहन भागवत देशाच्या लोकसंख्येवर बोलत आहेत. आताही भाजपकडे उत्तर नाही. सपाची विचारधारा आरएसएसशी जुळणारी नाही, पण त्यांनी काही बरोबर म्हटले असेल, तर त्याला बरोबर म्हणणे चुकीचे नाही.'

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहन भागवत यांना सवाल करत ते म्हणाले, 'जे आधी आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांना योग्य भाव नाही अन् मोहन भागवत जास्त मुले जन्माला घालण्याची वक्तव्ये करत आहेत. देशात बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत. चीनची लोकसंख्या कमी असताना आज तो महासत्ता बनला आहे. मोहन भागवत यांना चीनकडून शिकता येत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या बाबतीत देश शक्तिशाली बनवायचा आहे.' 

ओवेसींची टीकाऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मोहन भागवत म्हणतात की, लोकसंख्या वाढली पाहिजे, पण मुलांना काही फायदा मिळेल, याची खात्री ते करतील का? गरीब कुटुंबांना दरमहा 1500 रुपये देणार का? भागवतांनी आपल्या समाजातील उदाहरणे आधी दाखवावीत.'

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले. भारताचे लोकसंख्या धोरण सन 2000 च्या सुमारास ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मानवी जन्मदर 1 वर ठेवता येत नाही, त्यामुळे किमान 2 किंवा 3 मुले जन्माला आली पाहिजेत. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी