RSS Mohan Bhagwat:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना संघप्रमुखांनी एकतेवर भर दिला. ते म्हणाले की, “आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत.”
मोहन भागवत पुढे म्हणाले, “आज आपण स्वतःला वेगळे समजतो, पण वास्तव हे आहे की, आपण सर्व एकच आहोत. आपण कोणत्याही धर्म, भाषेचे किंवा प्रदेशाचे असलो तरी आपण हिंदू आहोत. आपल्यामध्ये फूट पाडणारे इंग्रज होते. आपण स्वतःकडे आध्यात्मिक आरशातून पाहिल्यास आपण एकच आहोत, हे जाणवेल. अहंकार सोडून आत्मपरीक्षण केल्यासच समाजात परिवर्तन येईल. खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचे आध्यात्मिक ज्ञान दैनंदिन जीवनात लागू केले पाहिजे. भारत जगाला शांती आणि समृद्धीचा संदेश देतो.”
‘अविभाजित भारत’चा संदर्भ आणि हक्क परत मिळवण्याचा उल्लेख करत भागवत म्हणाले, “जे लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, ते परदेशात जातात, तेव्हा संपूर्ण जग त्यांना हिंदू मानते. त्यांनी कितीही नाकरले तरी, सत्य हेच आहे की, ते हिंदू आहेत. भारताचे विभाजन झाले, तेव्हा येथील अनेक सिंधी पाकिस्तानात गेले नाहीत. नवीन पिढीने याचा विचार केला पाहिजे. ते आपले दुसरे घर आहे. इतरांनी आपले सामान आणि जागा घेतली, परंतु एक दिवस आपण आपला हक्क परत मिळवू.”
नागपूरातून एकतेचा संदेश आरएसएस प्रमुखांनी नागपुरातही एकतेचा संदेश दिला. विजयादशमीच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख म्हणाले होते की, “भारताची खरी ओळख पुन्हा निर्माण करण्याची वेळ आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या परकीय आक्रमणांनी आपली स्वदेशी व्यवस्था नष्ट केली. आता काळानुरुप समाजात आणि शिक्षण व्यवस्थेत पुन्हा स्थापित करण्याची आवश्यकता आहे. आपण अशा व्यक्ती तयार केल्या पाहिजेत, जे हे कार्य पूर्ण करू शकतील. यासाठी केवळ मानसिक संमतीची आवश्यकता नाही, तर मन, वाणी आणि कृतीचे परिवर्तन देखील आवश्यक आहे. हे परिवर्तन एका व्यवस्थेशिवाय अशक्य आहे आणि संघाची शाखा ही एकमेव मजबूत व्यवस्था आहे, जी हे काम करत आहे.”
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
Web Summary : Mohan Bhagwat emphasized unity, stating everyone is Hindu regardless of religion or language, blaming British for divisions. He urged spiritual reflection, reclaiming undivided India, and promoting India's spiritual knowledge for global peace and prosperity.
Web Summary : मोहन भागवत ने एकता पर जोर देते हुए कहा कि धर्म या भाषा कोई भी हो, हर कोई हिंदू है, विभाजन के लिए अंग्रेजों को दोषी ठहराया। उन्होंने आध्यात्मिक चिंतन, अविभाजित भारत को पुनः प्राप्त करने और वैश्विक शांति और समृद्धि के लिए भारत के आध्यात्मिक ज्ञान को बढ़ावा देने का आग्रह किया।