शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 17:45 IST

'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा'

नागपूर: भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं, हा संदेश सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानला दिला, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. देशाची सद्यस्थिती या विषयावर आधारित व्याख्यान मालिकेत कुमार बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचं सरकार असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असंही इंद्रेश कुमार म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात भाजपा सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं कुमार नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत म्हणाले. 'जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये असताना आम्ही 3-4 महत्त्वपूर्ण कामं केली. जेव्हा ही कामं पूर्णत्वास गेली, तेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आम्ही सत्तेचा त्याग केला,' असं त्यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असताना आम्ही दहशतवाद्यांविरोधात अभियान राबवलं. यामध्ये 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर, एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राईक जम्मू-काश्मीरमधील सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता, असं कुमार म्हणाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील सरकारबद्दल बोलताना त्यांनी पीडीपीचा उल्लेख टाळला. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्य कोणत्याही क्षणी लाहोरपर्यंत मुसंडी मारु शकतो, हा संदेश यातून पाकिस्तानला मिळाला,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान