शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:28 IST

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 75 वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपात स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी इंग्रजांसोबत चर्चा करण्यासाठी बापूंनी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची आपले एडीसी म्हणून निवड केली नसती, तर भारताचे तुकडे झाले नसते. एवढेच नाही, तर त्यावेळी बापूंनी सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस अथवा महर्षी अरविंद यांची एडीसी म्हणून निवड केली असती, तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या एका छोट्याशा चुकीने देशाची फाळणी केली, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. नुकतेच संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज न फडकावण्यासंदर्भात काँग्रेसने संघावर निशाणा साधला होता. यावर इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींसह इतर काही नेत्यांवर निशाणा साधला होता. आरएसएसला शिव्या देणे, ही लोक फॅशन समजतात, त्यांनी या फॅशनपासून मुक्त व्यायला हवे. हीच इश्वराकडे प्रार्थना, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.

राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला - काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभेत ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केले होते. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. यावरूनही इंद्रेश कुमार यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही लोकांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यांना राष्ट्रपतींचा अपमान करतानाही काही वाटत नाही. अशा प्रकारचे हे लोक आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू