Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ९ ठिकाणी हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ने एक निवेदन प्रसारित केले असून, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत मोदी सरकार आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे.
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संघाची भूमिका मांडली. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वृद्धिंगत झाले आहे.
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल
आम्हाला असा विश्वास आहे की, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे. या राष्ट्रीय संकट काळात संपूर्ण देश तन, मन आणि धन अर्पून सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे. भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे संघाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या आव्हानात्मक प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना आवाहन करतो की, सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पूर्ण पालन करावे. यासोबतच, या प्रसंगी, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व देशवासीयांना विनंती आहे की, देशभक्तीचा आदर्श प्रस्थापित करून लष्कर आणि नागरी प्रशासनाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहावे. राष्ट्रीय ऐक्य आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी.