RSS प्रसिद्धीसाठी काम करत नाही - मोहन भागवत
By Admin | Updated: March 29, 2016 20:16 IST2016-03-29T20:16:23+5:302016-03-29T20:16:23+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्धीसाठी सेवा करत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे

RSS प्रसिद्धीसाठी काम करत नाही - मोहन भागवत
>ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. २९ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्धीसाठी सेवा करत नाही असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. आम्ही प्रसिद्धी करत नाही, प्रसिद्धीसाठी आम्ही करत नाही. समाजासाठी संवेदनशील असणे हाच आरएसएसच्या कामाचा मुख्य भाग आहे. आणि जोपर्यत समाजात दुख: आहे तोपर्यत सेवा करणं सुरुच राहिल असं मोहन भागवत बोलले आहेत. संघाचा स्वयंसेवक हा कोणत्याही स्वार्थापासून मुक्त आहे. कोणतंही काम करण्यामागे त्याचा कोणता हेतू नसतो असं मोहन भागवतांनी म्हंटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या राज्यात आरएसएस करत असलेल्या कामाचा दाखला दिला आहे.