शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 09:49 IST

धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.

नवी दिल्ली - भारतीय राज्यघटनेमधील काही तरतुदींबाबतच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर विरोधकांकडून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असते. दरम्यान, संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने घटनेतील धर्मनिरपेक्ष शब्दाबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेले आणि प्रजन प्रवाहचे राष्ट्रीय संयोजन नंदकुमार यांनी राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा पुनर्विचार व्हावा, असे मत मांडले आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द पाश्चात्य कल्पना आहे, असा दावाही त्यांनी केला. देशाच्या राज्यघटनेमध्ये भारत हा एक लोकशाही संघराज्य, स्वायत्त, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष देश असेल, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र यातील धर्मनिरपेक्ष या शब्दाबाबत नंदकुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नंदकुमार म्हणाले की, ''धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.''

नंदकुमार यांनी गुरुवारी ''बदलते दौर मे हिंदुत्व'' नावाच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कृष्ण गोपाल यांनीह सहभाग घेतला होता. नंदकुमार यांनी ''पश्चिम बंगालचे इस्लामीकरण'' या आपल्या पुस्तकामधून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ''आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत याची ग्वाही देणारी पाटी लावण्याची गरज आहे का? की आपला व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून आपण ते सिद्ध केले पाहिजे? याचा विचार व्हायला हवा,'' असे नंदकुमार यांनी सांगितले. ''घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाला स्थान असणे गरजेचे नाही. तसेच संविधानाचे निर्मातेसुद्धा या शब्दाच्या विरोधात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर यांच्यासह सर्वांनी या शब्दाबाबत चर्चा केली होती. तसेच घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द असू नये असे मत मांडले होते. तरीही त्यावेळी या शब्दाची मागणी करण्यात आली, चर्चा करण्यात आली, तसेच घटनेत हा शब्द समाविष्ट करू नये, असा निर्णयही घेण्यात आला होता.''असे नंदकुमार म्हणाले. 
मात्र 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द समाविष्ट करण्यासाठी भर दिला. तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे याबाबतचे मत नाकारण्यात आले, असा दावाही त्यांनी केला. मात्र लोकसभेत 303 जागा असलेल्या भाजपावर धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी दबाव आणणार का? असे विचारले असता त्यावर भाष्य करण्यास नंदकुमार यांनी नकार दिला.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतPoliticsराजकारण