शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात आणि लिहिताना 'इंडिया' नाही फक्त भारत म्हणा, हे देशाचे जुने नाव आहे - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 15:36 IST

mohan bhagwat rss : भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे.

गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे. यावरून भाजपा सातत्याने विरोधकांवर टीका करत आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं आहे. गुवाहाटीमध्ये सरसंघाचे नेते मोहन भागवत यांनी लोकांना 'इंडिया'ऐवजी भारत बोलण्याचे आवाहन केलं आहे. आपल्या देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे, असं भागवत यांनी सांगितलं. 

मोहन भागवत म्हणाले की, शतकानुशतके या देशाचे नाव भारत आहे, 'इंडिया' नाही. म्हणून आपण देशाचे जुने नाव वापरावे. बोलताना आणि लिहिताना सर्वत्र भारत असा उल्लेख करावा. गुवाहाटी येथे जैन समाजाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. "शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते. आपला देश भारत आहे आणि आपण इंडिया हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे. सर्व व्यावहारिक क्षेत्रात भारत हा शब्द वापरण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच हा बदल घडेल. आपल्याला आपल्या देशाला भारत म्हणायचे आहे आणि इतरांनाही ते समजून सांगायला हवं", असंही RSS प्रमुखांनी नमूद केलं. अलीकडेच मोहन भागवत यांनी भारत हे 'हिंदू राष्ट्र' असून सर्व भारतीय हिंदू आहेत आणि सर्व भारतीय हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करतात. असं विधान केलं होतं.  

भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू - भागवतमोहन भागवत नागपूरच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीचा आहे. तसेच भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत आणि हिंदूचा अर्थ सर्व भारतीय. जे आज भारतात आहेत ते सर्व हिंदू संस्कृतीचे, हिंदू पूर्वजांचे आणि हिंदू भूमीचे आहेत आणि दुसरे काहीही नाही. काही लोकांना ते समजले आहे, तर काहीजण त्यांच्या सवयी आणि स्वार्थामुळे समजल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करत नाहीत. याशिवाय काही लोकांना ते अद्याप समजले नाही किंवा ते विसरले आहेत.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघguwahati-pcगौहतीHinduहिंदूIndiaभारत