शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही

By कमलेश वानखेडे | Updated: November 24, 2022 10:17 IST

शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत.

राजकोट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केशुभाई पटेल व विजय रूपाणी असे तीन तगडे मुख्यमंत्री देणाऱ्या राजकोट पश्चिम मतदारसंघात भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणाऱ्या परिवारातील डॉ.दर्शिता शाह यांना उमेदवारी दिली आहे. शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत. ५० वर्षांपासून हा भाजपचा गड आहे. येथे उमेदवार नाही, तर भाजप निवडून येते, असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळेच शहा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काहीच चुकीचा नाही, असे कार्यकर्ते बोलून दाखवितात.

विजयाचा सूर्य तळपण्याची चिन्हेकाँग्रेसने कडवा पाटीदार समाजाचे माजी नगरसेवक मनसुख कालरिया यांना रिंगणात उतरविले आहे, तर आपने मंडप डेकोरेशेनचे व्यावसायिक दिनेश जोशी यांना संधी दिली आहे. भाजपच्या भक्कम शक्तीपुढे काँग्रेस आणि आपकडून मांडले जात असलेले महागाई व बेरोजगारीचे मुद्दे या मतदारसंघात फिके पडताना दिसतात. त्यामुळे पश्चिम राजकोटमध्ये यावेळीही भाजपचा सूर्य मावळण्याची चिन्हे नाहीत.

असा आहे इतिहास...१९७५ मध्य केशुभाई पटेल येथून जिंकले व मुख्यमंत्री झाले.नरेंद्र मोदी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, फेब्रुवारी, २००२च्या पोटनिवडणुकीत मोदीही येथूनच पहिल्यांदा निवडून आले.विजूभाई वाला यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त जागेसाठी २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होत विजय रूपाणी हे मुख्यमंत्री झाले.२०१७ मध्ये पुन्हा विजय विजय रूपाणी येथून विजयी झाले व पुढे मुख्यमंत्री झाले.

पूर्व राजकोटमध्ये काँग्रेसला उद्याची संधी- पूर्व राजकोट मतदारसंघात भाजपने आणखी एक धाडसी निर्णय घेत, माजी वाहतूकमंत्री अरविंद रयाणी यांचे तिकीट कापले. येथे भाजपने जातीय समीकरणाच्या आधारावर ओबीसी कार्ड खेळत, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष उदय कानगड यांना उमेदवारी दिली आहे. - येथे काँग्रेसने इंद्रनील राज्यगुरू या गद्दावर माजी आमदाराला पुन्हा संधी दिली आहे. २०१२ मध्ये पूर्वमधून आमदार झालेल्या राज्यगुरू यांना २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना त्यांच्या पश्चिम मतदारसंघात आव्हान दिले होते. - राज्यगुरू हे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आपली घोषणा होईल, या आशेने आम आदमी पक्षात गेले होते, पण तसे न घडल्यामुळे १५ दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये परतले. राज्यगुरू हे काँग्रेसपेक्षा स्वत:बळावर भाजपला फाइट देत आहेत. ‘आप’ने लेहुआ पाटीदार समाजाचे राहुल भुवा यांच्यावर डाव खेळला आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाVijay Rupaniविजय रूपाणी