शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पाचशेच्या नोटांच्या छपाईवर ५००० कोटी खर्च, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:09 AM

गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले.वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांच्या १,६९५.७ कोटी नव्या नोटा या वर्षी ८ डिसेंबरपर्यंत छापल्या. त्यावर ४,९६८.८४ कोटी रुपये खर्च झाला. दोन हजार रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटा छापण्यात आल्या. त्यावर १,२९३.६ कोटी रुपये खर्च झाला. तसेच २०० रुपयांच्या १७८ कोटी नोटा छापण्यात आल्या त्यावर ५२२.८३ कोटी रुपये खर्च झाला. नोटाबंदीनंतर ५०, २००, ५०० आणि २,००० दर्शनी मूल्याच्या नोटा नव्या डिझाइनमध्ये आणण्यात आल्या, असे सरकारने सांगितले. अन्य प्रश्नाच्या उत्तरात राधाकृष्णन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणारा लाभांश २०१६-१७ मध्ये घसरून ३५,२१७ कोटी रुपयांवर आला. नव्या नोटांच्या छपाईवर झालेल्या अतिरिक्त खर्चामुळे लाभांशाची रक्कम घटली आहे. सन २०१५-१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने सरकारला ६५ हजार ८७६ कोटी रुपये लाभांश दिला होता. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १,००० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यामुळे चलनातील सुमारे ८६ टक्के नोटा गायब झाल्या होत्या. बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा लोकांनी बँकांत जमा केल्यांनंतर रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत.१५.२८ लाख कोटी आले परत-मंत्र्यांनी सभागृहास सांगितले की, ३० जून २०१७ रोजीच्या आकडेवारीनुसार १५.२८ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या आहेत. पडताळणी प्रक्रियेत या आकड्यात बदल होऊ शकतो. पुनर्मुद्रीकरण प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेने ५०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. तसेच २,००० आणि २०० च्या नोटा प्रथमच चलनात आणल्या.

टॅग्स :Note Banनोटाबंदी