रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी

By Admin | Updated: December 6, 2015 23:01 IST2015-12-06T23:01:26+5:302015-12-06T23:01:26+5:30

केंद्रातील रालोआ सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित करावे आणि या संघटनेवर बंदी घालावी,

RS Demand for ban on the team | रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी

रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी

रामपूर : केंद्रातील रालोआ सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित करावे आणि या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केली आहे.
‘ही संघटना (आरएसएस) समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा आपला अजेंडा राबविण्यात व्यग्र आहे. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येला जी परिस्थिती कारणीभूत ठरली होती, तशीच परिस्थिती आज देशात निर्माण करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे,’ असे खान म्हणाले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर तत्कालीन नेहरू सरकारने आरएसएसवर जशी बंदी घातली होती, तशीच बंदी आज घालण्यात आली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: RS Demand for ban on the team