127 रुपयांच्या गॅस अनुदानासाठी खर्च केले 810 रुपये
By Admin | Updated: June 20, 2017 13:12 IST2017-06-20T13:12:12+5:302017-06-20T13:12:12+5:30
येथील गांधीनगरमध्ये राहणा-या एका ज्येष्ठ नागरिकाला सरकारकडून मिळणा-या 127 रुपयांच्या गॅस अनुदानासाठी 810 रुपये खर्च करावे लागले आहेत. भास्करराय मूलशंकर वैद्य असे या नागरिकाचे नाव आहे.

127 रुपयांच्या गॅस अनुदानासाठी खर्च केले 810 रुपये
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 20 - येथील गांधीनगरमध्ये राहणा-या एका ज्येष्ठ नागरिकाला सरकारकडून मिळणा-या 127 रुपयांच्या गॅस अनुदानासाठी 810 रुपये खर्च करावे लागले आहेत. भास्करराय मूलशंकर वैद्य असे या नागरिकाचे नाव आहे.
भास्करराय वैद्य यांनी गॅस सिलिंडरवर मिळणा-या 127 रुपयांच्या अनुदानासाठी येथील स्थानिक गॅस एजन्सीविरोधात ग्राहक कोर्टात केस दाखल केली. या केसवरील सुनावणी जवळपास वर्षभर चालली.
अहमदनगरमधील गांधीनगर येथील ग्राहक कोर्टात गेल्या वर्षी येथील हार्दिक गॅस एजन्सीविरोधात भास्करराय वैद्य यांनी तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 2016 मध्ये जुलै महिन्यात त्यांना गॅस अनुदान मिळाले नाही.
भास्करराय वैद्य यांनी कोर्टात सांगितले की, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे सप्टेंबर 2016 मध्ये आधार कार्ड लिंक न करणा-यांना अनुदान देण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याची मुदत संपायच्या आधीच भास्करराय वैद्य यांनी अनुदान मिळणा-या सर्व कागदपत्रांची प्रक्रिया केली होती. तरी सुद्धा त्यांच्या बॅंक खात्यात गॅस अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत.
भास्करराय वैद्य यांना ऐकण्याचा आणि दिसण्याचा त्रास आहे. त्यांनी 127 रुपये गॅस अनुदान मिळविण्यासाठी वर्षभरात 810 रुपये खर्च केले. दरम्यान, कोर्टाने या केसवरील सुनावणीत हार्दिक गॅस एजन्सीला भास्करराय वैद्य यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.