अतिरेकी पकडल्यास ५१ कोटींचे इनाम
By Admin | Updated: January 9, 2015 01:41 IST2015-01-09T01:41:55+5:302015-01-09T01:41:55+5:30
चार्ली हेब्डो या साप्ताहिकाच्या १० पत्रकारांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ५१ कोटी रुपयांचे इनाम देण्यास आपण तयार आहोत,

अतिरेकी पकडल्यास ५१ कोटींचे इनाम
मीरत (उत्तर प्रदेश) : चार्ली हेब्डो या साप्ताहिकाच्या १० पत्रकारांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ५१ कोटी रुपयांचे इनाम देण्यास आपण तयार आहोत, असे बहुजन समाजवादी पार्टीचा नेता हाजी याकुब कुरेशी यांनी सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. तज्ज्ञांनी धर्मामध्ये हिंसेला स्थान नाही, असे म्हटले असले तरी, कुरेशी यांनी मात्र महंमद पैगंबरांचा अवमान करणाऱ्याला त्यांचे अनुयायी शिक्षा देणारच असे म्हटले आहे.
याआधी आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र काढले होते, त्यावेळी या व्यंगचित्रकाराला ठार मारणाऱ्याला कुरेशी यांनी ५१ कोटी रु पयांचे बक्षीस जाहीर केले होते. कुरेशी यांची वक्तव्ये कायद्याच्या संदर्भात तपासण्यात येतील आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.