निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये ३५,६०० कोटी रुपये पडून
By Admin | Updated: April 29, 2016 05:00 IST2016-04-29T05:00:28+5:302016-04-29T05:00:28+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ)निष्क्रिय खात्यांमध्ये ३५,५३१ कोटी रुपये तसेच पडून आहेत.

निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये ३५,६०० कोटी रुपये पडून
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ)निष्क्रिय खात्यांमध्ये ३५,५३१ कोटी रुपये तसेच पडून आहेत. यापैकी सर्वाधिक ७,७७७ कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे आहेत. अर्थात या खात्यांच्या नेमक्या संख्येबाबत सरकारकडे कुठलीही माहिती नाही.
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) ३१ मार्च २०१५ पर्यंत १५.८४ कोटी कर्मचाऱ्यांची खाती आहेत. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, निष्क्रिय इपीएफ खात्यांचा वेगळा रेकॉर्ड ठेवला जात नाही. पण किमान तीन वर्षे अंशदान न देणारी खाती निष्क्रिय मानली जातात.
निष्क्रिय खात्यांवर व्याज देण्याच्या प्रस्तावावर ते म्हणाले की, गेल्या २९ मार्चला केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी) आणि इपीएफओच्या २१२ व्या बैठकीत निष्क्रिय खात्यांची व्याख्या बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु मंत्रालयाला कुठलाही प्रस्ताव मिळालेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)