मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च
By Admin | Updated: March 22, 2015 19:32 IST2015-03-22T13:11:42+5:302015-03-22T19:32:35+5:30
गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-यांवर तब्बल ३१७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान होऊन १० महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच या कालावधीत मोदी सरकारच्या परदेश दौ-यावर सरकारी तिजोरीतून तब्बल ३१७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे युपीए २ मधील मंत्रिमंडळाच्या परदेश दौ-यांपेक्षा मोदी सरकारच्या परदेश दौ-यावरील खर्चात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यंच्या मंत्रिमंडळातील ६५ मंत्री यांच्या वेतन व अन्य भत्त्यांसाठी १४ कोटी रुपये खर्च झाले असून युपीएच्या ७५ सदस्यीय जंबो मंत्रिमंडळावरील खर्च व मोदी सरकारच्या मंत्रिमंडळावरील खर्च समान आहे. मोदी सरकारच्या कालावधीत मंत्री व अन्य अति महत्व्वाच्या व्यक्तींच्या ट्रॅव्हल खर्चही वाढल्याच समोर येते. यामध्ये केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री, माजी पंतप्रधानांच्या परदेश वारीसोबतच विद्यमान प्रधानमंत्री, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या दौ-यासाठी वापरलेल्या विमानांच्या देखभालीच्या खर्चाचा समावेश आहे. गेल्या वर्ष भऱात मोदी सरकारच्या परदेश दौ-यांवर ३१७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे मोदी सरकार या खर्चांना कात्री लावण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. २०१५ -१६ या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात मोदी सरकारने २६९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.
एकीकडे सरकारी खर्चांना कात्री लावण्याची घोषणा नरेंद्र मोदी करत असले तरी दुसरीकडे परदेश दौ-यांवरील खर्च वाढत असल्याचे दिसत आहे.