शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 9:45 AM

निश्चिलकरणाचा निर्णय जाहीर करताना मोदींनी केलेले दावे फोल

नवी दिल्ली: काळा पैसा, दहशतवादी कारवाया, बोगस नोटा, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चलीकरणाचा निर्णय घेतला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी देशवासीयांशी संवाद साधत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा 'कागज का तुकडा' होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर संपूर्ण देश रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा राहिला. भ्रष्टाचार, काळा पैसा, बोगस नोटा यांच्याविरोधातल्या महायज्ञात सहभागी होण्याची संधी देशवासीयांना मिळाली आहे. त्यामुळे जनतेनं या मोहिमेत सामील व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं होतं.निश्चलीकरणामुळे बोगस नोटांना आळा बसून अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दावा मोदींनी केला होता. यानंतर सरकारनं ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करुन ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची नक्कल करुन बोगस नोटा तयार करणं अतिशय अवघड असल्याचा सरकारचा दावा होता. मात्र नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीतून २ हजार रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अतिशय सोपं असल्याचं दिसून आलं आहे. २०१७ आणि २०१८ मध्ये सापडलेल्या बोगस नोटांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्यातल्या तब्बल ५६ टक्के नोटा २ हजाराच्या आहेत.८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी निश्चलीकरणाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर २०१७ मध्ये देशभरातून जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांमध्ये २ हजाराच्या नोटांचं प्रमाण ५३.३ टक्के होतं. २०१८ मध्ये हाच आकडा ६१.०१ टक्क्यांवर पोहोचला. निश्चलीकरणानंतर २ हजारसह पाचशेच्या नव्या नोटादेखील चलनात आल्या. या नोटांची नक्कलदेखील होऊ लागल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. २०१७ मध्ये देशभरातून जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचं प्रमाण १.५७ टक्के इतकं आहे. २०१८ मध्ये हाच आकडा ७.२१ टक्क्यांवर गेला. दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक बोगस नोटा गुजरातमध्ये सापडल्या आहेत. २०१८ च्या अखेरपर्यंत गुजरातमध्ये २ हजाराच्या ३४,६८० बोगस नोटा आढळून आल्या. देशभरात सापडलेल्या २ हजाराच्या बोगस नोटांचा विचार केल्यास त्यातील तब्बल २६.२८ टक्के नोटा एकट्या गुजरातमध्ये सापडल्या आहेत. यानंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Currencyभारतीय चलनNote Banनोटाबंदी