विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ
By Admin | Updated: July 1, 2014 14:54 IST2014-07-01T13:15:05+5:302014-07-01T14:54:45+5:30
पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - इंधन दरवाढीच्या धक्क्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक धक्का बसला आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दरही वाढले असून प्रत्येक सिलिंडरमागे आता १६ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.
इराक संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारल्याच्या पार्श्वभूमीवर कालच पेट्रोलच्या दरात १.६९ रुपये प्रतिलिटर तर डिझेलच्या दरात ५० पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. सततच्या भाववाढीमुळे त्रासलेल्या जनतेला आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरची भाववाढही सहन करावी लागणार आहे.
नव्या दरवाढीनुसार सबसिडीच्या १२ एलपीजी गॅस सिलिंडर्सनंतर तेराव्या सिलिंडरसाठी आता १६ रुपये ५० पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.