शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

माजी आमदाराकडे करोडोंचा काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:26 IST

Money Laundering Case : जितेंद्रनाथ पटनायक चंपुआ विभानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते.

ओडिशा : ईडीने (ED) माजी आमदार जितेंद्रनाथ पटनायक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. जितेंद्र पटनायक (Jitendra Nath Patnayak)यांच्या घरावर छापेमारी करत ७० लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३३.१७ कोटी रुपयांची मुदत ठेव जप्त केली आहे.  याशिवाय, ईडीने तपासात महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जमा केले आहेत. दरम्यान, जितेंद्रनाथ पटनायक चंपुआ विभानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते.

ओडिशाच्या दक्षता पथकाने (Vigilance team) गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्राच्या आधारे तपास पुढे नेत असताना ईडीला हे मोठे यश मिळाले. ओडिशाच्या दक्षता पथकाने नोव्हेंबर २००९ मध्ये पटनायक यांच्या विरोधात अवैध खाणकामाचा गुन्हा दाखल केला होता. जितेंद्रनाथ पटनायक यांच्यावर १९९९ ते २००९ यादरम्यान बेकायदेशीर उत्खनन केले होते, ज्यामध्ये सरकारला एकूण १३० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप होता. याप्रकरणाच्या चौकशीनंतर ओडिशाच्या दक्षता पथकाने २०१३ मध्ये आरोपपत्र सुद्धा दाखल केले होते, ज्यावर ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. 

ओडिशाच्या दक्षता पथकाने १३ वर्षांपूर्वी जितेंद्रनाथ पटनायकसह एकूण १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामधील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. एफआयआरनुसार, माजी आमदाराचे वडील बन्सीधर पटनायक यांच्याकडे ओडिशातील खणिज आणि लोह उत्खनन करण्याचा परवाना होता. जो त्यांना १९५९ मध्ये २० आणि ३० वर्षांसाठी देण्यात आला होता. मात्र, १९६७ मध्ये जितेंद्रनाथ पटनायक यांचे वडील बन्सीधर पटनायक यांनी २० वर्षांसाठी असलेल्या खजिण उत्खनन करण्याची लीज सोडून दिली परंतु लोह खाण लीज चालू ठेवली. लीजची मुदत संपण्यापूर्वी जितेंद्रनाथ पटनायक यांनी त्यांच्या वडिलांच्या वतीने पुन्हा भाडेपट्ट्यासाठी अर्ज केला, परंतु त्यानंतर १९९५ मध्ये त्यांचे वडील बन्सीधर यांचे निधन झाले.

अशाप्रकारे झाली फसवणूक!जितेंद्रनाथ पटनायक यांनी आपल्या वडिलांचे लीज वाढवून घेण्यासाठी दिलेले मृत्युपत्र आणि उत्खनन करण्यासाठी २० वर्षांच्या मंजुरीसाठी पुन्हा केलेला अर्ज नियमांच्या विरोधात असल्याचा आरोप होता. वडिलांच्या वतीने त्यांनी दाखल केलेले मृत्युपत्रही न्यायालयाने बनावट असल्याचे म्हटले आहे.ईडीने छापे टाकून जप्त केलेल्या रोख आणि मुदत ठेवींबाबत असे म्हटले आहे की, जे 130 कोटींचे नुकसान सरकारी तिजोरीत झाले होते, जवळपास तेवढीच रक्कम आरोपींकडून वसूल करण्यात आली आहे.

टॅग्स :OdishaओदिशाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय