बेकायदेशीर धर्मांतर आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथून अटक करण्यात आलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूरच्या अडचणी वाढत आहेत. ईडीने छांगूरच्या १५ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा केले. यापैकी १२ ठिकाणे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला, महाराष्ट्रातील मुंबईतील दोन आणि लखनौमधील एक आहेत.
छापेमारीदरम्यान ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, सोने, रोख रक्कम आणि आलिशान वाहने जप्त केली आहेत. तसेच दुबई, युएई आणि नेपाळमधून येणाऱ्या परदेशी निधीचेही संकेत मिळाले आहेत.
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
मिळालेल्या माहितीनुसार, ईडी ९ जुलै रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या आधारे छांगूरची चौकशी करत आहेत. तपासात छांगूरशी संबंधित ४० बँक खात्यांमध्ये १०६ कोटी रुपये असल्याचे उघड झाले आहे, यापैकी बहुतेक रक्कम पश्चिम आशियाई देशांमधून मिळाली होती. या परदेशी देणगीचा स्रोत आणि याचा नेमका उद्देश काय होता याबाबत ईडी तपास करत आहे.
मुंबई आणि लखनौध्येही छापे
ईडीने मुंबईतील माहीम आणि वांद्रे भागात शहजाद शेख उर्फ इलियास शेखच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले, त्याच्या खात्यात छांगुरने १ कोटी रुपये पाठवले होते. याशिवाय, छांगुरचा साथीदार राजेश उपाध्याय याच्या लखनौमधील चिन्हाट परिसरातील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली. बलरामपूरच्या उत्तरौला येथील छांगुरच्या त्या सर्व लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
ईडीच्या १२ पथकांनी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १३ तास छांगुर आणि त्याच्या साथीदारांच्या लपण्याच्या ठिकाणांची कसून झडती घेतली. या काळात अनेक मालमत्तांचे कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती आणि नेपाळमधून हवालाद्वारे पैसे आणल्याचे पुरावे सापडले. ईडीने छांगुरच्या जवळच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली आणि अशा १० लोकांचीही चौकशी केली.