आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी खेळली आहे. राजधानी दिल्लीतील ऑटो चालकांसाठी त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. यांत, कुठल्याही ऑटोचालकाच्या मुलीचे लग्न झाल्यास सरकार एक लाख रुपये देईल, प्रत्येक वाहन मालकाला 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल, आदी घोषणांचा समावेश आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "माझे ऑटो चालकांसोबत फार जुने नाते आहे. मला आठवते की, 2013 मध्ये माझा नवा-नवा पक्ष बनला होता. तेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा दिल्लीत ऑटो चालकांना झिडकारले जात होता. मी त्यांच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. हे लोक व्यवस्थेने पीडित आहेत. यावर, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक कामे केली. मी काल ऑटो चालक भावांसोबत बैठक केली. त्यांनी मला जेवणासाठी निमंत्रण दिले होते. त्यांनी फार चांगले भोजन बनवले होते. मी सांगू शकतो की, मी ऑटो चालकांचे मीठ खाल्ले आहे."
ऑटॉ चालकांसाठी अरविंद केजरीवाल यांच्या पाच घोषण -- ऑटो चालकांचा 10 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा- ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मदत- ऑटो चालकांच्या गणवेशासाठी वर्षातून दोन वेळा 2500 रुपयांची मदत- ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्च सरकार उचलणार- 'पूछो अॅप' पुन्हा चालू करणार
खरे तर, अरविंद केजरीवाल आपल्या पत्नीसह कोंडली परिसरात नवनीत कुमार नावाच्या एका ऑटो चालकाच्या घरी जेवणासाठी गेले होते. यानंतर त्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात नवनीत म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या घोषणा करून मिठाचे कर्ज फेडले आहे. ते घरी आले होते, त्यांनी जेवण केले. कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. त्यांनी यापूर्वीही ऑटो चालकांसाठी खूप काही केले आहे आणि भविष्यातही करत राहीन."
नवनीत यांच्या पत्नी म्हणाल्या, "केजरीवालांसाठी बरेच पकवान्न तयार केले होते. केजरीवाल आणि त्यांची पत्नी, दोघांनाही जेवण आवडले. त्यांनी कुटूंबियांची विचारपूस केली."