आर.आर. आबांच्या निधनाने हळहळले श्रीगोंदेकर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
श्रीगोंदा : राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असलेले आर.आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांपासून सामान्य माणसाला दु:खाचा धक्का बसला आहे.

आर.आर. आबांच्या निधनाने हळहळले श्रीगोंदेकर
श रीगोंदा : राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असलेले आर.आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांपासून सामान्य माणसाला दु:खाचा धक्का बसला आहे.आर.आर. पाटलांनी श्रीगोंदा, काष्टी, देवदैठण येथील सभा गाजविल्या. साईकृपा साखर कारखान्याची मोळी टाकण्यापासून काष्टीचे मदन गडदे यांच्या मेडिकलचे उद्घाटन अन् चांभुर्डीचे निवास नाईक सारख्या लहान कार्यकर्त्याच्या लग्नाला हजेरी लावून श्रीगोंदेकरांचा विश्वास संपादन केला होता.श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय शोकसभा झाली. या सभेत आख्तार शेख, बापू गोरे, ॲड. संभाजी बोरूडे, बाळासाहेब शेलार आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. (तालुका प्रतिनिधी)सच्चा मित्र हरपलाआर.आर. पाटलांबरोबर १९९० पासून विधानसभेत काम केले. उत्कृष्ट संसदपटू आणि विचारावर ठाम असलेला एक सच्चा मित्र हरपला. वसंतदादा पाटलांच्या तालमीत तयार झालेल्या आबांनी पवार साहेबांबरोबर शेवटपर्यंत निष्ठेने काम केले. एका सच्च्या मित्राला विनम्र अभिवादन.-बबनराव पाचपुते, माजी मंत्रीआर.आर. पाटील यांनी तंटामुक्ती व ग्रामस्वच्छता अभियान सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि उभ्या महाराष्ट्रात स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून छाप निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.-राहुल जगताप, आमदारजातीयवादी शक्तींच्या विरोधात लढाआर.आर. पाटलांनी आयुष्यभर जातीयवादी शक्तींच्या विरोधात दिलेला लढा आणि विधानसभेत केलेले काम, भाषणे याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होणार आहे.-शिवाजीराव नागवडे, माजी आमदारसाहेबांची पाठराखणएक नि:स्वार्थी, निगर्वी, राष्ट्रवादीचा एक निर्मळ चेहरा असलेल्या आर.आर. पाटलांच्या निधनाने मनाला धक्का बसला. त्यांनी पवारसाहेबांची अडचणीच्या काळात पाठराखण केली.-घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष, राकाँ.