शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला बी 'दिल्लीला' येऊ द्या की वं, आठवलेंनी भाजपाकडे मागितल्या एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 10:10 IST

दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आरपीआय उत्सुक

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं (आरपीआय) भाजपाकडे चार जागांची मागणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीभाजपाकडे चार जागा मागितल्या आहेत. भाजपासोबत युती न झाल्यास सहा जागांवर आरपीआय स्वबळावर लढेल, असा निर्धार आठवलेंनी केला आहे. त्यामुळे आता भाजपा नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. भाजपानं चार जागा न दिल्यास आरपीआय सहा जागांवर स्वबळावर लढेल आणि इतर जागांवर भाजपाला समर्थन देईल, असं आठवलेंनी म्हटलं आहे. आरपीआय दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं आठवलेंनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आमची भाजपासोबत चर्चा सुरू आहे. ही बातचीत निष्फळ ठरल्यास पक्ष सहा जागांवर उमेदवार देईल आणि इतर जागांवर भाजपाच्या पाठिशी उभा राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे योग्य उमेदवार असल्याचंदेखील ते म्हणाले.  यंदा दिल्लीत भाजपाचं सरकार येईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला. दिल्लीतलं वातावरण भाजपाच्या बाजूनं असून मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं लक्षात घेऊन मतदान करतील, असं आठवलेंनी म्हटलं. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या. तर भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाAAPआप