शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याचे जयपूरमध्ये शाही रिसेप्शन, अंबानी-अदानींसह ३५ विमानांमधून आले व्हीआयपी पाहुणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 10:43 IST

NCP leader Praful Patel's son's Reception : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये होत आहे.

जयपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा जयपूर येथे होत आहे. प्रजयचा रिसेप्शन सोहळा राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये होत आहे. या सोहळ्यामध्ये उद्योगपती अनील अंबानी आणि गौतम अदानींसह अनेक उद्योगपती, राजकारणी, चित्रपट क्षेत्रामधील कलाकार आणि क्रिकेटपटूंनी खास उपस्थिती लावली.

प्रफुल्ल पटेल यांचे पुत्र प्रजय पटेल याचा विवाह मुंबईतील ज्येलरी व्यावसायिक शिरीश पुंगिलिया यांची कन्या शिविका हिच्याशी झाला होता. शिरीष हे मुळचे जयपूरचे आहेत. त्यामुळे विवाहानंतरचा स्वागतसमारंभ जयपूर येथेच ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रजयच्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार, राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिक, क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासह जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. १८ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत सुमारे ३५ विमाने जयपूरमध्ये पोहोचली होती. प्रज्वल याच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योगपती सज्जन जिंदाल, अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेल समुहाचे प्रमुख सुनील भारती आणि त्यांची पत्नी, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदूजा हे जयपूरमध्ये पोहोचले आहेत.

त्याबरोबरच या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सलमान खान, शिल्पा शेट्टी, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेज लिमिटेडचे संस्थापक अनिल अग्रवाल, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हेसुद्धा जयपूरपर्यंत पोहोचले आहेत. त्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे ज्येष्ठ डॉक्टर आर.के. देशपांडे, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे हेही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

त्याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जया बच्चन, फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजपाचे नेते राजीव प्रताप रुढी हेही जयपूरमध्ये पोहोचले आहेत. यादरम्यान, विमानतळ व्यवस्थापनाने विमानांची ये जा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली गेली होती. तसेच विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarriageलग्न