मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरुन गोलाणीत हाणामारी

By Admin | Updated: November 4, 2015 23:29 IST2015-11-04T23:29:08+5:302015-11-04T23:29:08+5:30

परस्परविरोधी तक्रार दाखल : नित्याच्याच वादामुळे अन्य व्यावसायिक त्रस्त

Roundabout fight due to mobile repairs | मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरुन गोलाणीत हाणामारी

मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरुन गोलाणीत हाणामारी

स्परविरोधी तक्रार दाखल : नित्याच्याच वादामुळे अन्य व्यावसायिक त्रस्त
जळगाव: मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरुन बुधवारी सकाळी अकरा वाजता गोलाणी मार्केटमध्ये विक्रेता आकाश श्रीचंद कामनानी व ग्राहक प्रदीप दिलीप चौधरी (रा.रवंजा) यांच्यात वाद होवून हाणामारी झाली. या घटनेमुळे गोलाणीत गोंधळ उडाला होता. दरम्यान, परस्परविरोधी तक्रारी दिल्याने शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप चौधरी यांनी गोलाणी मार्केटमध्ये ग्रॅंड हाउस या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानात मोबाईल दुरुस्तीला टाकला होता. दुरुस्तीदरम्यान आकाश याच्याकडून मोबाईलचा स्पीकर खाली पडून खराब झाला. तो स्पीकर दुरुस्ती करुन देण्यासाठी वेगळे पैसे लागतील असे आकाशने प्रदीप यांना सांगितले, परंतु स्पीकर तुझ्यामुळे खराब झाला मी त्याचे पैसे देणार नाही असे सांगितल्यावर दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यातून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. आकाश याला मारहाण झाल्यामुळे दहा ते पंधरा जणांनी प्रदीपला मारहाण केली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. दोघांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. दरम्यान, मोबाईल दुकानदारांच्या सततच्या भांडणामुळे अन्य व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. खेडेगावातून आलेल्या ग्राहकांना दुकानदारांकडून मारहाण होण्याची ही दोन महिन्यातील तिसरी घटना आहे.
पोलीस स्टेशनला गर्दी
या हाणामारीनंतर गोलाणीत मोबाईल विक्रेत्यांनी दुकाने बंद करुन केली. आकाशच्या समर्थनार्थ पोलीस शहर पोलीस स्टेशनला दुकानदारांनी मोठी गर्दी केली. प्रदीप चौधरी याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने मारहाण करणार्‍या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दुकानदारावरही कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आकाश याच्यासह दहा ते पंधरा जणांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक मंधान यांनी मध्यस्थी करुन आपसातील वाद मिटविला.

Web Title: Roundabout fight due to mobile repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.