हैदरमधील भूमिका भोवली, श्रीनगरमध्ये इमाम यांना हटवले

By Admin | Updated: January 29, 2015 11:32 IST2015-01-29T11:25:51+5:302015-01-29T11:32:53+5:30

हैदर चित्रपटात भूमिका केल्याने जम्मू काश्मीरमधील मस्जिद ए बाबा दाऊद खाकी येथील इमाम गुलाम हुसैन शहा यांना इमामपदावरुन हटवण्यात आले आहे.

The role of Haider in Bhawli, Imam was removed in Srinagar | हैदरमधील भूमिका भोवली, श्रीनगरमध्ये इमाम यांना हटवले

हैदरमधील भूमिका भोवली, श्रीनगरमध्ये इमाम यांना हटवले

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. २९ - हैदर चित्रपटात भूमिका केल्याने जम्मू काश्मीरमधील मस्जिद ए बाबा दाऊद खाकी येथील इमाम गुलाम हुसैन शहा यांना इमामपदावरुन हटवण्यात आले आहे. इमाम यांनी चित्रपटात काम करणे अनैतिक  असल्याचे मस्जिद प्रशासनाचे म्हणणे असून या कारवाईनंतर संबंधीत इमामाने चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. 

हैदर चित्रपटात तब्बूने साकारलेल्या गझाला मीर या भूमिकेच्या निकाहामध्ये मस्जिद ए बाबा दाऊद खाकी येथील इमाम गुलाम हसन शाह यांनी इमामची छोटेखानी भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका इमाम गुलाम हसन शाह यांना चांगलीच महागात पडली. त्यांना मस्जिद प्रशासनाने इमाम पदावरुन हटवले आहे. या कारवाईनंतर गुलाम हसन शाह यांनी विशाल भारद्वाज यांना नोटीस बजावली आहे. 'भारद्वाज यांनी शैक्षणिक कामासाठी शुटींग करत असल्याचे सांगितले होते. मात्र आता ते दृष्य चित्रपटात वापरले गेले' असे गुलाम शाह यांचे म्हणणे आहे. परवानगी न घेता प्रतिमेचा वापर केल्याबद्दल ही नोटीस बजावल्याचे हसन यांच्या वकिलांनी सांगितले. नुकसानभरपाई म्हणून विशाल भारद्वाज यांनी ५० लाख रुपये द्यावे अशी मागणीही हसन यांनी केली आहे.  

Web Title: The role of Haider in Bhawli, Imam was removed in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.