शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"मी शेतीसाठी नोकरी सोडली"; वडील-भावाला जमलं नाही ते लेकीने केलं, कमावले 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 15:10 IST

वडील आणि भावांने शेतीकडे पाठ फिरवत दुसरं काहीतरी काम करायचं ठरवलं होतं. रोजाने यातून वर्षाला एक कोटी रुपये कमवून दाखवले. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत (MNC) नोकरी मिळवणं हे बहुतेक लोकांचं स्वप्न असतं. रोजा रेड्डी सक्सेस यांच्या बाबतीत ही गोष्ट थोडी उलट आहे. एका आघाडीच्या टेक्नॉलॉजी फर्ममधली नोकरी सोडून तिने शेतीलाच आपले सर्वस्व बनवलं. शेतकरी होण्याचं तिचं स्वप्न होतं. शेतीसाठी तिने घरच्यांशी भांडणही केलं. वडील आणि भावांने शेतीकडे पाठ फिरवत दुसरं काहीतरी काम करायचं ठरवलं होतं. रोजाने यातून वर्षाला एक कोटी रुपये कमवून दाखवले. 

रोजा आता नोकरी सोडून शेतकरी झाली आहे. आज सगळेच तिचं कौतुक करतात. शेती हा मोठा उद्योग असल्याचं तिने सिद्ध केलं. रोजाचा जन्म कर्नाटकातील डोन्नेहल्ली गावात झाला. कुटुंबीय शेती करायचे. घरातील सदस्यांची इच्छा होती की तिने शेतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शहरात राहून अभ्यास करून काम करावं. पण, जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हा तिच्या कंपनीने घरून काम करण्याचा पर्याय दिला. रोजाने याचा उपयोग मोठी संधी म्हणून केला.

रोजा सांगते की, तिचे भाऊ आणि वडील नुकसानीमुळे शेती सोडणार होते. तिने शेतीचं आव्हान स्वीकारलं. त्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. नोकरीची वेळ संपल्यानंतर ती संध्याकाळी चार वाजल्यापासून शेतात काम करू लागली. उत्पादनात घट होण्याचे कारण तिने शोधून काढले. रसायनाचा अतिवापर हे त्याचे कारण होते. रोजाने ठरवले की ती सेंद्रिय पद्धतीने शेतीची सुपीकता पुनर्संचयित करेल. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मुलीने सेंद्रिय शेती सुरू केली. रोजाने आपली नियमित नोकरी सोडू नये अशी कुटुंबाची इच्छा होती.

सेंद्रिय शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकते यावर बहुतांश गावकऱ्यांचा आणि रोजाच्या कुटुंबाचा विश्वास नव्हता. रोजा सांगते की नातेवाईक, गावकरी आणि कुटुंबीयांनी तिची खिल्ली उडवली. नोकरी सोडली आणि शेतकरी बनली. रोजा यांनी शेतात 40 प्रकारच्या भाज्या पिकवण्यास सुरुवात केली. यामध्ये वांगी आणि सिमला मिरचीचा समावेश होता. तिने विविध तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यास सुरुवात केली. सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी