शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

प्रेरणादायी! MBA पास तरुणाने नोकरी सोडली अन् शक्कल लढवली; 'अशी' करतोय लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:21 IST

MBA pass youth quit his job and started business : नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे. प्रदीप श्योराण असं या व्य़क्तीचं नाव असून ते हरियाणाचा रहिवासी आहे. प्रदीप यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली आणि बागरी मिल्क पार्लर सुरू केले. पूर्वी हा फक्त एक छोटा स्टॉल होता आणि आज रोहतकमध्ये त्यांचे एक चांगले आऊटलेट आहे. सुरुवातीला दुधापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज विविध प्रकारच्या 20 उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे.

हरियाणातीलच नाही तर दिल्ली, पंजाब, राजस्थानमधूनही लोक प्रदीपच्या "बागडी मिल्क पार्लर"मध्ये येत असतात. या संदर्भात प्रदीप यांनी लहान-मोठ्या शहरातील सुशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील तरुण अशा प्रकारे स्वत:चे काम करून कुटुंबाला पुढे नेऊ शकतात. प्रदीप हे मूळचे हरियाणातील चरखी दादरी या जिल्ह्यातील मांढी पिरानू गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील शाळेत नोकरी करायचे. प्रदीप यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली, पण त्यात यश न मिळाल्याने त्याने एमबीएला प्रवेश घेतला. 

एमबीएची पदवीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण सुरुवातीला त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकली नाही. काही काळानंतर त्यांना व्हेल्स इलेक्ट्रिकमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि ते त्या कंपनीत 2018 पर्यंत होते. नोकरीत त्यांना अनेकवेळा प्रमोशनही मिळाले आणि पगारही चांगला होता. पण या कामातून त्यांना समाधान मिळत नव्हते. प्रदीप यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची काही बचत होती आणि कुटुंबातील काही सदस्यांचाही पाठिंबा मिळाला. 2018 मध्ये नोकरी सोडून त्यांनी सुमारे 24 राज्यांतील विविध शेतकरी, व्यावसायिकांना भेटी दिल्या. 

प्रदीप यांना बिझनेस तर करायचाच होता पण असा काही बिझनेस करायचा होता ज्याला मार्केट मध्ये डिमांड आहे आणि जो चालणार आहे. प्रदीप यांनी त्यांच्या सर्व दौऱ्यांमधून त्यांना एकच गोष्ट समजली की शेतकरी तीन प्रकारचे व्यवसाय करू शकतात - पहिला तृणधान्ये, कडधान्ये इत्यादी, दुसरा दूध आणि तिसरा अंडी इ. त्यामुळे आम्ही दूध व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं. रोहतकमध्ये दोन मोठी उद्याने आहेत, जिथे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते. या उद्यानांच्या बाहेर त्यांनी आपले ‘बागडी मिल्क पार्लर’ सुरू केले. त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरुवात केली तेव्हा थंडीच्या काळात ते मातीच्या कुल्हडमध्ये गरम दूध द्यायचे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी