शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:49 IST

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून भारतात राहू शकत नाही असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून भारतात राहू शकत नाही असं म्हटलं आहे. प्रतिज्ञापत्रात रोहिंग्या मुसलमान भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असल्याचं केंद्राने म्हटलं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी रोहिंग्या मुस्लिमांचं भारताबाहेर जाणं गरजेचं आहे. कोणत्याही अवैध स्थलांतरिताला भारतात राहण्याचा अधिकार नाही असं केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. रोहिंग्यांच्या पाठवणीविरोधातील याचिकेवर 18 सप्टेंबर रोजी सुनावणी-भारतात बेकायदेशीररित्या राहात असलेल्या रोहिंग्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेबाबत अतिरिक्त साँलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केंद्र सरकारचे मत काय आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. या खंडपिठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.भारतात राहात असलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी प्रसिद्ध करुन केंद्र सरकारने सर्वात जास्त रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असल्याचे स्पष्ट केले होते. या रोहिंग्यांना पुन्हा पाठवण्याचा मानस सरकारने व्यक्त केल्यावर दोन स्थलांतरित  रोहिंग्या आश्रित मोहम्मद सलिमुल्लाह आणि मोहम्मद शाकिर यांनी त्याला याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. या दोघांच्या मते ते यूएनएचसीआरच्या ( युनायटेड नेशन्स हाय कमिशन आँफ रेफ्युजीज)  नियमांनुसार नोंदणीकृत आश्रित असून ते म्यानमारमधून जीव वाचवण्याच्या उद्देशाने भारतात आलेले आहेत. ही याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. याचिकेत त्यांनी रोहिंग्याना परत पाठवण्याची योजना मूलभूत अधिकारांविरोधात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात असल्याचे म्हटले आहे. रोहिंग्यांना परत पाठवण्याची योजना घटनेतील कलम १४, २१ आणि ५१(क) विरुद्ध असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर रोहिंग्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. भारताने विविध करारांमध्ये नाँन रिफोलमेंट हे तत्त्व मान्य केले आहे. (म्हणजेच जिवाला धोका असणार्या प्रदेशातील आश्रितांचे रक्षण करुन त्यांच्यावर परत जाण्यास दबाव न आणण्याचे तत्त्व) भारताने वेळोवेळी गरजू आश्रितांसाठी आपली दारं खुली केली आहेत अशी आठवणही याचिकेत करुन देण्यात आली आहे. यूएनएचसीआरने केंद्र सरकारच्या या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या योजनेबाबत १८ आँगस्ट रोजीच नोटीस बजावलेली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय