शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Rohingya Crisis : भारताचा 'हा' शेजारी देश रोहिंग्यांमुळे त्रस्त! गृह मंत्र्यांनी दिला लष्कर तैनात करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:34 IST

Rohingya Crisis : बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत.

बांगलादेशात (Bangladesh) रोहिग्या शरणार्थिची समस्या (Rohingya Refugees Crisis) सातत्याने वाढताना दिसत आहे. खरे तर बांगलादेश, या रोहिंग्या शरणार्थींना त्यांच्या देशात पाठविण्याचा प्रयत्नही करत आहे. यातच आता, गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने आणि अंमली पदार्थांचे (Drugs) स्मगलिंग रोखण्याच्या दृष्टीने, आवश्यकता भासल्यास रोहिंग्या शरणार्थींच्या कॅम्पमध्ये लष्कर तैनात करण्यात येईल, असे बांगलादेशचे गृह मंत्री (Home Minister) असदुज्जमां खान कमाल (Asaduzzaman Khan Kamal) यांनी म्हटले आहे. 

कॉक्स बाजारात 7 पटींनी वाढली गुन्हेगारी - बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्या अनेक वेळा आपल्या भाषणात पोलीस रिपोर्टचा हवाला देत म्हणाल्या होत्या, की काही रोहिंग्या शरणार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नेतृत्व करत आहेत आणि ते कॅम्प कट्टरपंथी संघटनांसाठी गड बनले आहेत.

रोहिग्यांना परत पाठवण्याच्या प्रयत्नात बांगलादेश - यातच, 'गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रोहिंग्या शरणार्थींचे मोबाईल फोन ट्रॅक केले जातील,' असे बांगलादेशचे गृह मंत्री असदुज्जमां खान यांनी म्हटले आहे. याशिवाय, रोहिंग्यांना लवकरच परत पाठविले जाईल. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, 2017 मध्ये म्यांमारच्या लष्करी कारवाईला घाबहून तेथून पळ काढलेल्या रोहिंग्या शरणार्थींचे बांगलादेशने खुल्या हातांनी स्वागत केले होते. मात्र, आता त्यांची वेगाने वाढत  असलेली लोकसंख्या आणि गुन्हेगारीतील त्यांचा कथित सहभाग यामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. कारण बांगलादेश पाच वर्षांनंतरही या संकटावरील समाधान शोधण्यासाठी संघर्ष करत आहे. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशSoldierसैनिक