पेठ, कुरवंडी परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव; प्राचार्यांची पोलिसात तक्रार

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

पेठ : सातगाव पठार भागातील पेठ ते कुरवंडी रस्त्यावर मारुती मंदिर परिसरात तसेच श्री वाकेश्वर विद्यालय परिसरात महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. तसेच विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंच्या हातवार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत श्री वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे-पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात रोडरोमिओंची तक्रार दाखल केली आहे.

Rodromís disorder in Peth, Kurvandi area; Complaints of the police in the principals | पेठ, कुरवंडी परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव; प्राचार्यांची पोलिसात तक्रार

पेठ, कुरवंडी परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव; प्राचार्यांची पोलिसात तक्रार

ठ : सातगाव पठार भागातील पेठ ते कुरवंडी रस्त्यावर मारुती मंदिर परिसरात तसेच श्री वाकेश्वर विद्यालय परिसरात महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. तसेच विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंच्या हातवार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत श्री वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे-पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात रोडरोमिओंची तक्रार दाखल केली आहे.
गावात सध्या रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. महाविद्यालय परिसरात व इतर ठिकाणी रोडरोमिओ रस्त्यावर उभे असतात. सकाळी व सायंकाळी महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस हे रोडरोमिओ टोळक्याने उभे असतात व मुलींना बघून हातवारे करतात. त्यामुळे मुलींना रस्त्यावरून चालताना रोडरोमिओंचा त्रास होतो. महाविद्यालय सुटल्यानंतर रोडरोमिओ आपली मोटारसायकल घेऊन मुलींच्यासमोर उभे राहतात. तसेच त्यांच्या मागे सुसाट वेगाने मोटारसायकल घेऊन त्यांची छेड काढण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मात्र विद्यार्थिनी असे प्रकार घरी सांगत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.
पुणे-नाशिक रस्त्यालगत पेठ येथील वाकेश्वर विद्यालय आहे. येथील महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. इयत्ता बारावीपर्यंत येथे एकूण ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी व पालकांनी मुलींना होत असलेल्या छेडछाडीबाबत तक्रारी केल्या आहेत. श्री वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे-पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात रोडरोमिओंची तक्रार दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी परिसरातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Rodromís disorder in Peth, Kurvandi area; Complaints of the police in the principals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.