‘रॉक गार्डन’चे निर्माते कालवश
By Admin | Updated: June 12, 2015 23:54 IST2015-06-12T23:54:22+5:302015-06-12T23:54:22+5:30
टाकाऊ वस्तूंपासून डोळे दिपवणाऱ्या कलाकृती साकारणारे कलावंत आणि चंदीगडमधील सुप्रसिद्ध ‘रॉक गार्डन’चे निर्माते नेकचंद यांचे शुक्रवारी

‘रॉक गार्डन’चे निर्माते कालवश
चंदीगड : टाकाऊ वस्तूंपासून डोळे दिपवणाऱ्या कलाकृती साकारणारे कलावंत आणि चंदीगडमधील सुप्रसिद्ध ‘रॉक गार्डन’चे निर्माते नेकचंद यांचे शुक्रवारी हृदविकाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
नेकचंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चंदीगड प्रशासनाने शुक्रवारी सर्व कार्यालयांना सुटी जाहीर केली. पद्मश्रीप्राप्त नेकचंद नागरिकांनी फेकून दिलेल्या वस्तूंमधून त्यांनी असंख्य कलाकृती निर्माण केल्या. चंदीगडमध्ये ३५ एकरावर पसरलेल्या ‘रॉक गार्डन’मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक बोर्डावरील बटण, ट्यूबलाईट, दगड, फुटलेल्या टाईल्स, प्लग अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून असंख्य कलाकृती साकारल्या आहेत. १९७६ मध्ये रॉक गार्डनचे उद्घाटन झाले होते. (वृत्तसंस्था)