मारहाण करून महिलेस लुटले
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30
शिक्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला.

मारहाण करून महिलेस लुटले
श क्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : शिक्रापूर येथील मनीषा विहार या सोसायटीत अरुणा शंकर मोहळ (वय ३५) या महिला पतीसह राहतात. त्यांचे पती नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी गेले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या सदनिकेमध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी ए. सी. बसविण्यासाठी तीस टक्के सूट आहे, असे सांगत बळजबरीने प्रवेश केला. या चोरट्यांनी अरुणा यांना मारहाण करीत त्यांच्या तोंडात कानटोपी कोंबली व त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. त्यांचे डोळे फडक्याने बांधले. यानंतर कपाटातील पंधरा हजार रुपये रोख, एक मोबाइल, कानातील, हातातील सोन्याचा सुमारे अडीच तोळ्याचा ऐवज चोरला. घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.०००००