रोडसाइड रोमियोची एका मुलीने केली पोलीस ठाण्यातच धुलाई

By Admin | Updated: July 7, 2015 16:25 IST2015-07-07T16:25:02+5:302015-07-07T16:25:02+5:30

मुलींची छेडछाड करणा-या एका रोडसाइड रोमिओला संजाना नावाच्या मुलीने चांगलाच धडा शिकवला असून तिने पोलीस ठाण्यातच या गुंडाची धुलाई केली

Roadside Romeo's daughter washed in a police station | रोडसाइड रोमियोची एका मुलीने केली पोलीस ठाण्यातच धुलाई

रोडसाइड रोमियोची एका मुलीने केली पोलीस ठाण्यातच धुलाई

>ऑनलाइन लोकमत
पिलिभीत (उत्तर प्रदेश), दि. ७ - मुलींची छेडछाड करणा-या एका रोडसाइड रोमिओला संजाना नावाच्या मुलीने चांगलाच धडा शिकवला असून तिने पोलीस ठाण्यातच या गुंडाची धुलाई केली. या घटनेचे चित्रीकरण खुद्द पोलीस अधिका-यांनीच केले आणि ते व्हायरल झाले आहे.
अंकित नावाचा गुंड मुलगा त्या परीसरातल्या मुलींची छेड काढत असे. अश्लील बोलण्याने आणि छेडछाडीने त्रस्त झाल्यामुळे अखेर संजनाने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. तो बाईकवरून तिचा पाठलाग करत असताना संजना पोलीस ठाण्याच्या दिशेने गेली आणि ठाणे जवळ आल्यावर तिने त्याला कॉलर खेचून खाली उतरवले आणि नंतर त्याला पोलीस ठाण्यात नेले. तिथे पोलीसांसमोर संजनाने अंकितची धुलाई केली. अक्षरश: चपलेने त्याला बडवतानाचे चित्रीकरण खुद्द पोलीस अधिका-यांनीच केले.
तिची हजार वेळामाफी मागत अंकित तिच्या पाया पडला आणि असं पु्न्हा वागणार नाही असं मनवत राहिल्याचेही या चित्रीकरणात दिसून आले आहे. संजनाच्या या धाडसाचे सर्व स्तरांमध्ये कौतुक होत असून अशा गावगुंडांना असाच धड़ा शिकवा.ला हवा असे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Roadside Romeo's daughter washed in a police station