‘रस्ता सुरक्षा विषय शालेय अभ्यासात सामील करावा’
By Admin | Updated: April 11, 2015 00:55 IST2015-04-11T00:55:34+5:302015-04-11T00:55:34+5:30
रस्ता सुरक्षा हा विषय देशभरातील शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनविला जाऊ शकतो. राज्यांच्या शिक्षण मंडळांनी हा विषय अभ्यासक्रमामध्ये सामील करावा

‘रस्ता सुरक्षा विषय शालेय अभ्यासात सामील करावा’
नवी दिल्ली : रस्ता सुरक्षा हा विषय देशभरातील शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनविला जाऊ शकतो. राज्यांच्या शिक्षण मंडळांनी हा विषय अभ्यासक्रमामध्ये सामील करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक खात्याचे सचिव विजय छिब्बर यांनी पत्रकारांना दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षेवरील एक धडा सामील केलेला आहे आणि गडकरी यांनी राज्यांनाही
अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)