बोहरपट्टी ते रामसेतूपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद
By Admin | Updated: June 6, 2015 00:35 IST2015-06-06T00:34:52+5:302015-06-06T00:35:15+5:30
बोहरपट्टी ते रामसेतूपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

बोहरपट्टी ते रामसेतूपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद
नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बोहरपट्टी ते रामसेतूपर्यंतच्या रस्त्याचे कॉँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गणेशवाडी देवी चौक ते गाडगे महाराज पूल, गाडगे महाराज पूल ते नेहरू चौक, दहीपूल; महावीर स्वीट, जिजामाता रोड ते टकले ज्वेलर्सपर्यंत आणि बोहरपट्टी ते रामसेतू गोदावरी नदीपात्रापर्यंतच्या रस्त्यांचे कॉँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यांचे काम चार टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोहरपट्टी ते रामसेतूपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने सदर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
याशिवाय सदर मार्ग ‘नो पार्किंग झोन’ म्हणूनही घोषित करण्यात आला आहे. मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने गोदावरी नदीपात्र रामसेतूकडून भांडीबाजारमार्गे टकले ज्वेलर्स, बोहरपट्टी, रविवार कारंजाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही नेहरू चौकमार्गे इतरत्र जाईल. (प्रतिनिधी)