शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 20:54 IST

Road Accident in India: सीट बेल्ट न लावल्यामुळे 16,397 आणि हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोकांचा मृत्यू.

Road Accident in India: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये 16,397 लोकांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 8,438 चालक आणि उर्वरित 7,959 प्रवासी होते. 'Road Accidents in India - 2021' नावाच्या या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोक रस्ते अपघातात मरण पावले, त्यापैकी 32,877 चालक आणि 13,716 प्रवासी होते. 2021 मध्ये एकूण 4,12,432 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,53,972 लोकांचा मृत्यू झाला तर 3,84,448 लोक जखमी झाले.

स्वतःच्या सुरक्षेत हलगर्जीपणारिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 93,763 लोक जखमी झाले तर सीट बेल्ट न लावल्यामुळे 39,231 लोक जखमी झाले. हेल्मेट आणि सीट बेल्ट यांसारखी सुरक्षा उपकरणे रस्ते अपघातात प्राणघातक आणि गंभीर इजा टाळतात. म्हणूनच सध्याच्या वाहतुकीच्या नियमांनुसार कारमध्ये सीट बेल्ट आणि दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, तर त्याचे चालान पोलिसांकडून कापले जाते. 

या राज्यात सर्वाधिक अपघातराष्ट्रीय स्तरावर रस्ते अपघात मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. एकूण मृत्यू प्रकरणांपैकी 15.2 टक्के प्रकरणे फक्त उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत. 2020 मध्येही रस्ते अपघातातील मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर होता. रिपोर्टनुसार, 2021 मध्ये उत्तर प्रदेशानंतर तामिळनाडू (9.4 टक्के), महाराष्ट्र (7.3 टक्के) आणि राजस्थान (6.8 टक्के) आहे.

या कारणामुळे अपघातरिपोर्टनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण अपघातांपैकी सुमारे 8.2 टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, लाल दिवा ओलांडणे आणि मोबाईल फोन वापरणे यामुळे झाले आहेत. म्हणूनच, या सर्व चुका टाळा आणि सुरक्षित प्रवास करा असे वारंवार सांगितले जाते. तरीदेखील अनेकजण नियम मोडताना आढळतात.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू