आर के पचौरी यांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 14:50 IST2016-02-18T14:50:22+5:302016-02-18T14:50:22+5:30
आर के पचौरी यांच्यावर अगोदरच लैंगिक शोषणाचे आरोप झाले असताना पिडीत तरुणीने अश्लील बोलणे, धमकावणे तसंच जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत

आर के पचौरी यांच्या अडचणीत वाढ
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 18 - टेरीचे माजी संचालक आर के पचौरी यांच्या अडचणीत कमी होताना दिसत नाही आहेत. आर के पचौरी यांच्यावर अगोदरच लैंगिक शोषणाचे आरोप झाले असताना पिडीत तरुणीने अश्लील बोलणे, धमकावणे तसंच जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत.
इकॉनॉनिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च 2014मध्ये हवामान बदल परिषदेत आपल्या पुरुष सहका-यासोबत बोलल्यामुळे आर के पचौरी यांनी तरुणीला धमकी दिली होती. 'जर तुझा बॉयफ्रेंड असेल, तर मी त्याला नपुंसक करेन' अशी धमकी दिल्याचा आरोप 2 पिडीत तरुणींपैकी एकीने केला आहे. मेस्किकोला जाण्यासाठी विमान प्रवास सुरु करण्याआधी आर के पचौरी यांनी अशी धमकी दिली होती.
याव्यतिरिक्त ऑक्टोबर 2013मध्ये पॅरिसला जात असताना आर के पचौरी यांनी जबरदस्ती करत जवळ घेण्याचा तसंच चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे.