शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लालूंचे चिरंजीव बसणार सोनिया गांधींच्या पंगतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 10:52 IST

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजसोबत हातमिळवणी केल्यापासून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला लालूप्रसाद यादव यांचे पूत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. येत्या 13 तारखेला हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजसोबत हातमिळवणी केल्यापासून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागला आहे. काही दिवसांपूर्वीच अनेक वर्ष जुन्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना सीबीआयने न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची रवानगी तुरूंगात झाली होती. याशिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही वेगवेगळ्य़ा प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचे ऐकून त्यांची बहीण गंगोत्री देवी यांना जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सध्या यादव कुटुंबीयांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13 मार्चला सोनिया गांधी आणि तेजस्वी यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना १३ मार्च रोजी रात्री भोजनासाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेस अधिवेशनाआधी हे भोजन होणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) असलेल्या पक्षांनाही त्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात तेलगू देसम पक्ष (टीडीपी) व तेलंगण राष्ट्र समितीचा (टीएसआर) समावेश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता सोनिया गांधी यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.या बैठकीत मोदी सरकारविरोधात संसदेत व बाहेर भूमिका घेण्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. टीडीपीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जंतरमंतरला गेले व त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. काँग्रेसला सत्ता मिळाली तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे या भोजनाला टीडीपी नेते जातील, असे दिसते.तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही तिथे यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी बॅनर्जी यांच्याशी स्वत: सोनिया संपर्क साधणार असल्याची चर्चा होती.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीTejashwi Yadavतेजस्वी यादव