शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे...’ राजद नेत्याचे PFIला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 21:52 IST

PFIच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली.

पाटणा: PFI(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली. या घटनेनंतर बराच गदारोळ झाला असून, त्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, यावर बिहारमधील राजद नेते शिवानंद तिवारी यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणे हा केवळ निषेधाचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही की, घोषणा देणारे पाकिस्तानी होऊन पाकिस्तानात जातील, असे वक्तव्य शिवानंद तिवारी यांनी केले आहे. 

देशभरात पीएफआयच्या ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ संघटनेने 23 सप्टेंबर रोजी पुण्यात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. निदर्शने चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी सुमारे 40 आंदोलकांना अटक केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यांनी शिंदे सरकारकडे आंदोलकांवर कठोर कारवाईची मागणी केली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीयाया घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, अशाप्रकारच्या घोषणा महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही, असे ते म्हणाले. तर, या घोषणाबाजीत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारPuneपुणे