शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 20:06 IST

Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली.

बिहार : आरजेडी  (RJD) नेता तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी आपला लहान भाऊ तेजस्वी यादव ( Tejashawi Yadav) यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. सध्या केवळ राजकीय लढाई लढत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली.

तेज प्रताप यादव हे जेपी गोलंबरपासून अनवाणी चालत आगमकुआन परिसरात असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर याठिकाणी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, 'आज तक'शी संवाद साधताना तेज प्रताप यांनी सांगितले की, त्यांचा तेजस्वी यांच्यासोबत कोणताही वाद नाही. तेज प्रताप यादव म्हणाले, माझा कोणाशीही वाद नाही. माझा वाद नितीशकुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. कुटुंब एक वेगळी जागा आहे आणि राजकीय लढा हे स्वतःचे वेगळे स्थान आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी (Shivanand Tiwari) यांनी तेज प्रताप यादव यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले होते. यावर भाष्य करताना तेज प्रताप यादव म्हणाले, जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी आणि कृष्णाचा भक्त आहे. मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही. जय प्रकाश नारायण यांचे अनुयायी आणि श्री कृष्णाचे भक्त असलेल्यांना पक्षातून कोण बाहेर काढू शकतो? असा सवालही त्यांनी केला.

शिवानंद तिवारी यांचा दावाआरजेडी पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तेज प्रताप यादव आरजेडीमध्ये नसल्याचा दावा केला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह कंदील वापरण्याची परवानगी नाही, असा दावाही शिवानंद तिवारी केला. 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार