रितिका-रोहितच आज शुभमंगल

By Admin | Updated: December 13, 2015 13:39 IST2015-12-13T13:39:38+5:302015-12-13T13:39:38+5:30

मैदानावर चौकार, षटकारांची बरसात करुन चाहत्यांची मने जिंकणारा रोहित शर्मा आज आयुष्यभरासाठी विवाहबंधनात बांधला जाणार आहे.

Ritika-Rohit is today Shubhamangal | रितिका-रोहितच आज शुभमंगल

रितिका-रोहितच आज शुभमंगल

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - मैदानावर चौकार, षटकारांची बरसात करुन चाहत्यांची मने जिंकणारा रोहित शर्मा आज आयुष्यभरासाठी विवाहबंधनात बांधला जाणार आहे. रोहितला त्यांची सात जन्मांची जोडीदार भेटली असून, रोहित आज मैत्रीण रितिका सजदेसोबत विवाहबध्द होत आहे. मुंबईत हा शानदार विवाहसोहळा होत असून, रोहितच्या लग्नाला टीम इंडियातील कोण कोण उपस्थित रहाणार याची माध्यमांमध्ये उत्सुक्ता आहे. 
२०१५ मध्ये टीम इंडियातील अनेक बॅचलर्स विवाहबध्द झाले आहेत. आधी अजिंक्य रहाणे त्यानंतर सुरेश रैना नंतर हरभजन आणि वर्षाच्या शेवटी रोहित विवाहबध्द होत आहे. रोहित आणि रितिकाची ओळख मागच्या आठवर्षांपासून आहे. इतर क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित आणि रितिकाच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली नव्हती. 
रोहित आणि रितिकामध्ये आधी व्यावसायिक नाते होते. रितिका रोहीतची मॅनेजर म्हणून काम संभाळत होती. त्यातून त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार झाले. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा विवाह होणार आहे. 
 
 

Web Title: Ritika-Rohit is today Shubhamangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.