शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: भाजपला धक्का; मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप खासदारपुत्र पोहोचले अखिलेश यादवांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 22:58 IST

Uttar Pradesh Assembly Election: लखनऊमध्ये उद्या होणार मतदान; भाजप खासदारपुत्र अखिलेश यादवांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी भाजपचे मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता तीन टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर अखिलेश यादव यांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक जोशी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. मयंक जोशी यांना लखनऊ केंटमधून उमेदवारी हवी होती. त्यांना तिकीट मिळावं यासाठी रिटा बहुगुणा जोशी प्रयत्नशील होत्या. पुढील लोकसभा निवडणुकीत मला तिकीट नको. पण विधानसभा निवडणुकीत मयंकला उमेदवारी द्या, अशी मागणी त्यांनी नेतृत्त्वाकडे केली होती. मात्र मयंक यांना तिकीट दिलं गेलं नाही.

लखनऊमध्ये उद्या मतदान होणार आहे. मात्र त्याआधीच मयंक अखिलेश यांच्या भेटीला पोहोचले. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मयंक समाजवादी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. पण त्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी अखिलेश यादव यांचीभेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीचा थेट परिणाम उद्या होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो. 

उत्तर प्रदेशातल्या हाय प्रोफाईल मतदारसंघांमध्ये लखनऊ केंटचा समावेश होतो. इथून भाजपनं राज्य मंत्री बृजेश पाठक यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे. याच मतदारसंघातून अपर्णा यादव यांनाही उमेदवारी हवी होती. अखिलेश यादव यांच्याकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यानं अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली. अपर्णा यादव या मुलायम सिंग यादव यांच्या सूनबाई आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा