शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

कोविशिल्ड घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटचा धोका, आयसीएमआरच्या अभ्यासात निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:28 IST

या अभ्यासातून हे सूचित होते की, भारतात काही लोकांना कोविशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोविड-१९ ची बाधा झाली होती त्यांना पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांच्या नमुन्यांच्या केलेल्या अभ्यासात १६.१ टक्के नमुन्यांत कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटला (बी १.६१७.२) तोंड देणाऱ्या अँटिबॉडीज सापडल्या नाहीत, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. याशिवाय कोविशिल्ड लसीची एकच मात्रा घेतलेल्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासात ५८.१ टक्क्यांमध्ये ॲटिबॉडीज सापडल्या नाहीत. (Risk of delta variant even for those who take Covishield says ICMR study) हा अभ्यास इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्चने केला असून या अभ्यासाची अजून समीक्षा झालेली नाही. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. टी. जॅकोब जॉन म्हणाले की, “दिसले नाही याचा अर्थ ते नाहीत, असे नाही. अँटिबॉडीजची पातळी इतकी कमी असू शकेल की ती शोधलीच गेली नाही. परंतु, ती तेथे असू शकेल आणि व्यक्तिचे विषाणूपासून आणि गंभीर आजारापासून संरक्षण करू शकेल. याशिवाय काही पेशी या प्रतिकार शक्तीसाठी मध्यस्थ म्हणून काम करतील म्हणजे व्यक्तिच्या संरक्षणाचे काम होईल.” सीरमने अभ्यासासाठी सदृढ व्यक्तिंचा उपयोग केला, असे गृहित धरू. वृद्ध, सहव्याधी असलेले किंवा जुनाट आजार असल्यामुळे ज्यांची प्रतिकार पातळी कमी आहे अशा व्यक्तिंच्या तुलनेत अँटिबॉडीजचे निरीक्षण न केलेल्या व्यक्तिंमधील प्रतिकार शक्तिची पातळी जास्त असेल.मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय,फुफ्फुस, मूत्रपिंडाची जुनाट दुखणी असलेल्या किंवा कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ६५ वर्षांच्या पुढील पुरूषांना (महिला या अँटिबॉडीजची पातळी जास्त निर्माण करतात) लसीची तिसरी मात्रा दिली गेली पाहिजे,” असे डॉ. जॉन म्हणाले.

अतिरिक्त मात्रा?या अभ्यासातून हे सूचित होते की, भारतात काही लोकांना कोविशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोविड-१९ ची बाधा झाली होती त्यांना पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस