शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो? AIIMS च्या रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:29 IST

मृतदेह हाताळणार्‍या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेच्या दृष्टिकोनातून पार्थिवाच्या शरीरातून बाहेर येणारे द्रवपदार्थ टाळण्यासाठी नाक आणि घशाचा भाग बंद केला पाहिजे.गेल्या एक वर्षात एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागात 'कोविड -१९ पॉझिटिव्ह मेडिको-लीगल' मृतदेहांवर अभ्यास करण्यात आला.मृत्यूनंतर १२ ते २४ तासांच्या काळात जवळपास १०० मृतदेहांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली.

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे बळी घेतले आहेत. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृतांची वाढलेली आकडेवारी चिंतेचे कारण आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेहही कुटुंबातील सदस्य घ्यायला तयार नाहीत अशा अनेक बातम्या समोर येतात. यात आता दिल्लीतील प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती काळ कोरोनाचे विषाणू सक्रीय असतात त्यावर रिसर्च केला आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चे फॉरेन्सिक हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, एका संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ ते २४ तासानंतर कोरोना विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही. त्यामुळे मृतापासून कोरोना संसर्गाचा धोका जास्त नाही, मृत्यूनंतर १२ ते २४ तासांच्या काळात जवळपास १०० मृतदेहांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितले.

मृत्यूच्या २४ तासानंतर, विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त नाही. गेल्या एक वर्षात एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागात 'कोविड -१९ पॉझिटिव्ह मेडिको-लीगल' मृतदेहांवर अभ्यास करण्यात आला. या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पार्थिवाच्या शरीरातून बाहेर येणारे द्रवपदार्थ टाळण्यासाठी नाक आणि घशाचा भाग बंद केला पाहिजे. असे मृतदेह हाताळणार्‍या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.

मृतदेहाच्या अस्थी सुरक्षित

मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थी आणि राख ही पूर्णपणे सुरक्षित आहे. अस्थींतून संक्रमण पसरण्याचा कोणाताही धोका नाही. एम्सने मे २०२० मध्ये जारी केलेल्या कोविड १९ रुग्णांच्या मृत्यूनंतर एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यात फॉरेन्सिक पोस्टमोर्टम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. कारण मृतकाच्या शरीरात असणारे द्रव पदार्थाच्या संपर्कात येणंही जीवघेण्या रोगाच्या संपर्कात येण्याचा धोका होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालय