शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांकडून 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 21:07 IST

श्रीनगरच्या प्रेस कॉलनी परिसरात बुखारींवर हल्ला

श्रीनगर: ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. श्रीनगरमधील प्रेस कॉलनी परिसरात बुखारी यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ते गंभीर झाले. यानंतर त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 सुजात बुखारी जम्मू काश्मीरमधून प्रकाशित होणाऱ्या रायझिंग काश्मीर या दैनिकाचे संपादक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त केलं. मुफ्ती यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बुखारी यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेनं आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये बुखारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक एसपीओ जखमी झाला आहे. रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांच्या हत्येवर राहुल गांधींनीही दुःख व्यक्त केलं आहे. निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला