शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर सरकारला आली जाग; एका रात्रीत केली 'त्या' रस्त्याची दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 20:49 IST

Rishabh Pant Accident: टीम इंडिया स्टार क्रिकेटर रिषभ पंतचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. सध्या त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत शुक्रवारी भीषण अपघातात जखमी झाला. या दुर्घटनेला 48 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी या अपघातामागील कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नरसन येथील महामार्गावर झालेल्या या अपघाताच्या कारणाबाबत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. उत्तराखंड पोलीस रिषभ पंतच्या वक्तव्याच्या आधारे अपघाताचे कारण सांगत आहेत.

याउलट डीडीसीएचे प्राधिकरण या अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे असल्याचे सांगत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, खड्डे टाळताना रिषभच्या कारचा अपघात झाला. रविवारी रुग्णालयात रिषभ पंतची भेट घेतल्यानंतर पुष्कर सिंग धामी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे तसेच महामार्गावरील बंधाऱ्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. यासोबतच महामार्गाची सर्व्हिस लेनही अद्याप तयार झालेली नाही, अशा स्थितीत अपघात होणे स्वाभाविक आहे.

अपघातानंतर प्रशासनाला जाग आलीअपघातस्थळ हे मृत्यूचे ठिकाण बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणाभोवती शेकडो अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, मात्र कोणीही काही करायला तयार नाही, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आता ताजी माहिती अशी की, ज्या ठिकाणी ऋषभचा अपघात झाला, तिथए महामार्ग प्राधिकरणाने एका रात्रीत दुरुस्ती केली आहे. 

स्थानिक काय म्हणाले?या ठिकाणी अनेक अपघात झाले असून हे ठिकाण मृत्यूचे ठिकाण बनल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. जेव्हा वाहने वेगाने येतात तेव्हा लेन लहान असल्यामुळे वाहनचालकाला ब्रेक लावमे कठीण जाते. वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची शक्यताही जास्त असते. अपघातानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्याच ठिकाणी असलेले खड्डे रातोरात भरण्यात आले आहेत. 

टॅग्स :Rishabh Pantरिषभ पंतAccidentअपघातUttarakhandउत्तराखंड