शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्वी’ ताऱ्याचा उदय, तरुण नेत्याने गाजवून सोडले बिहारचे रणांगण; प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत छाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:01 IST

तेजस्वी यांचा क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत दिग्गज नेत्यांना ३१ वर्षांचा तरुण नेता पुरुन उरला. हा तरुण नेता आहे तेजस्वी यादव. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचा नेता. प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत सर्वत्र तेजस्वी यादव यांनी छाप सोडली.

तेजस्वी यांचा क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास आहे. ही निवडणूक त्यांनीच खऱ्या अर्थाने गाजविली. त्यांना त्यात प्रत्यक्ष अनुभव कमी. वडील तुरुंगात. तरीही निराश न होता जिद्दीने तो मैदानात उतरला. मतदारसंघाची बांधणी करण्याचे काम हळूहळू सुरुच होते. त्यानंतर डावपेच आखून तिकीटवाटप केले. त्यांनी प्रचारात सुरुवातीला असलेली भाजपची हवाच पूर्णपणे काढून घेतली. त्यांच्या सभांना गर्दी व्हायला लागली व तेजस्वी यांची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

जेडीयुचे नेते नितीशकुमार हे स्वत: चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी मैदानात उतरले. अखेरच्या प्रचारसभेत त्यांनी यंदाची निवडणूक अखेरची असल्याचे वक्तव्य केले. प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्यापासून भाजपचे दिग्गज नेते उतरले होते. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी मोठी होती. या सर्वांना तेजस्वी यांनी तगडे आव्हान दिले. तरीही प्रचारामध्ये तेजस्वी यांनीच भाव खाल्ला.एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिले. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल, मंगलराज सुरू होईल. ज्याप्रमाणे ते लढत आहेत, हा एक चांगला संकेत असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.

वडील व बराच काळ मुख्यमंत्री असलेले लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात तुरुंगामध्ये, आईही माजी मुख्यमंत्री, पण प्रचारासाठी तिचा उपयोग नाही, मोठा भाऊ तेजप्रताप अत्यंत विक्षिप्त. बहीण मिसामुळे मते कमी होण्याची शक्यता असल्याने तिला प्रचारापासून दूर ठेवले. सारा भार एकट्या तेजस्वीनेच उचलला. लालूंच्या नावाने मते मागितली नाहीत आणि जातीची समीकरणे केली नाहीत. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा हेच मुद्दे मांडून नितीश कुमार व भाजपपुढील अडचणी वाढवण्याचे प्रयत्न केले प्रचारात त्यांनी लोकांच्या मनातले मुद्दे घेतले. जेव्हा त्यांनी १० लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले, तरुणांनी त्यांना प्रतिसाद दिला. आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न असेल, त्यांनी मतदारांच्या वर्मावर बोट ठेवले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादव